डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल

By -
353
Spread the love

डीएसकेंना अॅडमिट करण्याची आवश्यकता, डॉक्टरांचा अहवाल

 

 

पुणे : पोलिसांच्या ताब्यात असलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांना अॅडमिट करण्याची आवश्यकता असल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयाच्या दहा डॉक्टरांच्या टीमने डीएसकेंच्या प्रकृतीची तपासणी केली.

डॉक्टरांच्या टीममध्ये सर्व प्रकारच्या तज्ञांचा समावेश होता. हृदय, मेंदू, अस्थीरोग यांसह सर्व प्रकारची तपासणी करण्यात आली. दरम्यान, डीएसकेंवर उपचार करण्यासाठी आवश्यक तज्ञ डॉक्टर आणि सुविधा उपलब्ध आहेत, अशी माहिती ससून रुग्णालयाच्या डीनने दिली आहे.

गुंतवणूकदारांचे 230 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी डीएसकेंवर गुन्हा दाखल आहे. तीन दिवसांपूर्वी याप्रकरणी कोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती. मात्र, कोठडीत येताच ते पाय घसरुन पडल्याचं सांगण्यात आलं. तसंच त्यांच्या डोक्याला इजा झाल्याचंही पोलिसांनी म्हटलं होतं.

यानंतर डीएसकेंना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, डीएसकेंच्या वकिलांनी गंभीर प्रकृतीचं कारण पुढे करत त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार कऱण्याची मुभा मागितली. जी मान्य करण्यात आली आणि डीएसकेंना काल दीनानाथ रुग्णालयात हलवण्यात आलं होतं.

Facebook Comments
Previous articleOPINION POLL सैनिकांच्या अगोदर म्हणजे फक्त तीन दिवसात स्वयंसेवक लढण्यासाठी सज्ज करण्याचा सरसंघचालकांचा दावा हा सैन्यावरील अविश्वास आहे का? नाही होय VoteView Results या सर्व घोटाळ्यांमध्ये बँकेतील तुमचा पैसा किती सुरक्षित आहे?
Next article10 PLACES IN EUROPE TO GO TO BEFORE YOU TURN 30