‘परी’ पाहून बायकोचा अभिमान वाटला : विराट कोहली

By -
436
Spread the love

‘परी’ पाहून बायकोचा अभिमान वाटला : विराट कोहली

'परी' पाहून बायकोचा अभिमान वाटला : विराट कोहली

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माच्या ‘परी’ सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. सिनेमाचं प्रमोशनही जोरदार सुरु आहे. त्यातच आता विराट कोहलीने ‘परी’ चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

होळीच्या मुहूर्तावर बॉक्सवर ऑफिसवर आज अनुष्का शर्माचा ‘परी’ रिलीज झाला आहे. प्रदर्शनाच्या पूर्वसंध्येला पती विराटने जबाबदारी उचलत ‘परी’चं स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं होतं. चित्रपट पाहल्यानंतर भारावलेल्या विराटने ट्विटरवर अनुष्का आणि चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक केलं.

विराटने लिहिलं आहे की, “काल रात्री ‘परी’ पाहिला. माझ्या पत्नीची आतापर्यंतची ही सर्वोत्तम भूमिका आहे. मोठ्या काळानंतर एक चांगला चित्रपट पाहिला. सिनेमा पाहताना थोडा घाबरलो, पण मला तुझा अभिमान आहे अनुष्का शर्मा.”

Facebook Comments
Previous articleChinese prisoners working on CPEC in Pakistan: MP
Next articleSalman is in big trouble again